# Business Plus Plus (मराठी आवृत्ती)

# तांत्रिक फायदे :

 1. अद्यावद कार्यप्रणाली आणि तंत्रज्ञान वापरून तयार केलेले सॉफ्टवेअर.
 2. विंडोज ७ ते विंडोज १० पर्यंतच्या ३२ किंवा ६४ बीट सॉफ्टवेअर वर वापरता येते, लॅपटॉप, डेस्कटॉप दोघांवरही वापरता येते.
 3. शून्य सॉफ्टवेअर ची आवश्यकता. सॉफ्टवेअर सुरळीत चालण्यासाठी काही फ्रेमवर्क सॉफ्टवेअर ची आवश्यकता असते त्यावर आधारित सॉफ्टवेअर बनवली जातात जसे ISAM, .Net Frameworks. या सॉफ्टवेअरला अशा कोणत्याही सॉफ्टवेअरची आवश्यकता नाही.
 4. मराठी दिसण्यासाठी अतिरिक्त हार्डवेअर ची आवश्यकता नाही GIST कार्ड किंवा डोंगल (Dongle).
 5. बॅकअप फाईल वायरस कमीत कमी इजा पोहचवू शकेल याची काळजी घेतली आहे
 6. बॅकअप हा तुमची स्वतःची साईट असेल तर FTP माध्यमातून त्यात एक आवृत्ती ठेवलं नसेल तर आमच्या साईट वर कूटबद्ध करून साठवून ठेवेल.
 7. नेटवर्क रेडी, एकपेक्षा अधिक संगणक LAN नेटवर्क नी जोडले असतील आणि त्यात सॉफ्टवेअर स्थापित केले असेल तर आपण डेटा कोणत्याही संगणकातून हाताळू शकतो.
 8. रिमोट डेस्कटॉप सॉफ्टवेअर वापरून जलद सेवा देण्यासाठी कटीबद्ध.
 9. डॉट मॅट्रिक्स, इंकजेट, लेजर जेट, बबल जेट, टॅंक प्रिंटर कोणत्याही कंपनी किंवा मॉडेलचा प्रिंटर वापरण्यास रेडी. बिलासाठी थर्मल प्रिंटरचा वापरही करता येतो.

# कंपनी आणि सेवे समंधित फायदे :

 1. ३०० हुन अधिक समाधानी ग्राहक वर्ग.
 2. महाराष्ट्रातील ६ पेक्षा जास्त बाजार समित्यांतील आडते व व्यापारी लाभ घेत आहेत.
 3. १२ वर्षाहून अधिक वर्षे कंपनी कार्यव्रत.
 4. तंत्र कुशल कर्मचारी वर्ग.
 5. वेब वेस इंटरनेट आवृत्ती काम चालू असून लवकरच प्रकाशित होईल.
 6. नवीन आवृत्ती वेबसाईट वर नेहमी उपलब्ध असते आपण त्याची माहिती घेऊन तिला प्रशिक्षित अभियंत्यांकडून स्थापित करू शकता.
 7. नवीन आवृत्ती स्थापित करताना सॉफ्टवेअर प्रशिक्षणा मध्ये तासिकेचे बंधन नाही जो पर्यंत वापरकर्त्याचे समाधान होई पर्यंत.
 8. महत्वाचे संगणक हाताळणी, सॉफ्टवेअर प्रशिक्षण या संबंधित विडिओ बनवण्याचे काम चालू आहे ज्याच्या माध्यमातून अपल्याला सॉफ्टवेअर संबंधित किंवा नवीन वैशिष्ठे आली असल्यास ती परत परत मागे पुढे जाऊन विडिओ च्या माध्यमातून आपल्या वेळेनुसार मोबाईल किंवा संगणकावर पाहता येईल.

# प्रमुख वैशिष्ठे :

 1. बिनचूक माहितीचे संकलन आणि जलद गतीने माहितीवर आधारित रिपोर्टच्या माध्यमातून डेटा उपलब्ध करून देणे.
 2. शिकण्यासाठी आणि वापरण्यासाठी अत्यंत सोपे आणि सुटसुटीत सॉफ्टवेअर.
 3. मराठी टायपिंग साठी व्हेज हेड, व्हेज टेक्स्ट, शिवाजी, सरजूदास फॉन्ट ची सोय उपलब्ध आहे.
 4. एस.एम.एस. सुविधा उपलब्ध.
 5. पट्ट्या, मेमो फॅक्स तसेच इमेज किंवा पीडीएफ फाईल बनवून व्हाट्स करण्याची सोय.
 6. ऑटो बॅकअप, आपण डेटा मध्ये काही बदल केले असतील तर प्रोग्राम बंद करताना स्वतः बॅकअप घेतो
 7. सर्वप्रकारचे मालप्रकार भाजीपाला, फळ, कांदा, बटाटे व भुसार मालासाठी मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध.
 8. कॅरेट / जाळी जमा, नावे तसेच त्याची खटावणी, टोटल पावती जाळीशी संबंधित सर्व व्यवहार करण्याची सोय.
 9. पट्टी किंवा गिर्हाईक बिला वरील कर किंवा खर्च त्यांचे दर हवे तेव्हा बदल्याची सोय. महाराष्ट्र बाहेरील व्यापारी मालावरील बाजार समिती कर आणि तेथील कराच्या आकारणीच्या पद्धती समाविष्ट केलेल्या आहेत.
 10. वापसीचा हिशेब ठेवता येतो.
 11. आयात माल (कंटेनर) रिपोर्ट उपलब्ध आहे.
 12. पट्टी भरत असताना चालू चालू मध्ये या आधी त्या मालधन्याला किंवा त्याच्याशि निगडित किंवा गावातील इतर कोणत्याही मालधन्याचा दर आणि उतारा एका क्लीक मध्ये उपलब्ध होतो.
 13. वित्तीय वर्ष एप्रिल ते मार्च किंवा दिवाळी ते दिवाळी किंवा जानेवारी ते डिसेम्बर आपण सेट करू शकतो.
 14. एकापेक्षा अधिक बाजारसमिती लायसेन्स किंवा कंपनी आपण स्वतंत्र्य रित्या हाताळू शकतो (अटी नियम लागू ).
 15. पट्टी नावे जात असल्यास त्याच्या खर्चात बदल करून ती शून्य बाकी किंवा जमा रक्कम सेट करून ती पट्टी लॉक करता येते जेणे करून भविष्यात त्यात कोणताही बदल होणार नाही. अशी लॉक केलेली पट्टी गरज वाटल्यास केव्हाही लॉक, अनलॉक करता येते.
 16. आवक भरली असता कच्चे धडाबुक छापता येते व मह्त्वाचे म्हणजे डागा प्रमाणे गिऱ्हाईक भरण्यासाठी जागा सोडता येते उदा २ डागाला कमी तर १० डागाला जास्त जागा लागेल.
 17. रिपोर्ट छापण्या आधी त्याचा प्रिंट प्रीव्हिव्ह दाखवतो, रिपोर्ट पेज निवडायची सोय व टॉप, बॉटम, लेफ्ट, राईट मार्जिन आपल्या सोइ प्रमाणे कायमस्वरूपी सेट करण्याची सोय.
 18. आवक भरण्यासाठी दोन सोप्या पद्धती उपलब्ध पट्टिबुक आणि धडाबुक.
 19. आधी गिर्हाईक भरून व त्याप्रमाणे शेतकरी पट्टी भरता येते. आधी पट्टीचा व्यापार भरा व त्यानंतर गिऱ्हाईक भरा अशी कोणतीही सक्ती नाही पट्टी पेंडिंग ठेऊन गिर्हाईकाचे भाव निश्चित करता येतात.
 20. ट्याली (Tally) मध्ये किंवा एक्सेल मध्ये डेटा एक्स्पोर्ट करता येतो.

# एस.एम.एस. सुविधा

आपण सॉफ्टवेअर मधून एस. एम. एस. शेतकरी, गिऱ्हाईक यांना पाठवु शकता. जसे पट्टी मधील वजन, भाव दर या साठी १५ हुन अधिक टेम्प्लेट उपलब्ध केलेले आहेत त्याचा वापर करून आपण पट्टी, मेमो शेतकरी किंवा हुंडेकर्याला पाठवू शकता. गिर्हाईकाला त्याचे बिल रोजच्या कलमांची बाकी पाठवण्यासाठी ६ हुन अधिक टेम्प्लेट उपलब्ध आहेत. हे एस. एम. एस. आपल्या फर्म च्या नावाचे रेजिस्ट्रेशन करून पाठवता येतात. यात आपल्या कंपनीच्या नावाचे एस. एम. एस. जातात. या सुविधे मुळे माहितीची देवाण घेवाण जलद पद्धतीने होते व आजच्या युगात एस. एम. एस. चा जास्तीत जास्त वापर हि काळाची गरज आहे.

# ऑनलाईन बॅकअप

तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअर चा बॅकअप तुमच्या वेबसाईटवर च्या माध्यमातून अपलोड करू शकता. जर तुमच्या कडे स्वतःची वेब स्टोरेज नसेल तर आम्ही माफक दरात हि सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. बॅकअप वेबसाईटवर अपलोड केल्यावर त्या फाईल्स कुटबद्ध होतात जेणे करून कोणालाही तुमचा बॅकअप फाईल्स वाचता येणार नाहीत. जर तुम्ही बॅकअप सुविधा घेतली असेल तर मागील सर्व वर्षांचा डेटा हि तुम्ही अपलोड करू शकता त्यावर कोणतेही बंधन नाही. हि सुविधा फक्त बिझनेस प्लस सॉफ्टवेअर चा डेटा फाईल्स साठी मर्यादित आहे. इतर फाईल्स जसे विडिओ, ऑडिओ आणि इतर कोणत्याही फाईल्स साठी नाही. हि सुविधा किती रकमेला उपलब्ध आहे ते तपासण्यासाठी येथे क्लीक करा खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

# रिपोर्ट यादी